विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिवल २०२५ हा कला, संस्कृती आणि मनोरंजनाचा एक अविस्मरणीय सोहळा ठरला. या उत्सवात महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक विरासत उजळून निघाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या उत्सवाचा समारोप करण्यात आला. यावेळी विविध कलाकारांनी आपल्या प्रतिभावंत कलाकृतींचे प्रदर्शन केले.
कला, संस्कृती आणि मनोरंजनाचा अविस्मरणीय सोहळा
रा. ८.२५ वा, १३-१-२०२५, ठाणे: ठाणे येथे दरवर्षी हा सोहळा संपन्न होतो, तसेच यावर्षी हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा सांस्कृतिक कार्यक्रम हजारांच्या उपस्तिथ पार पडला. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा या सोहळ्याला हजेरी लावली. या उत्सवात शास्त्रीय संगीत, लावणी, नृत्य आणि नाटक यासारख्या विविध कला प्रकारांचे सादर्शन करण्यात आले. याशिवाय, हस्तकला, चित्रकला आणि शिल्पकला यांसारख्या दृश्य कलांचे प्रदर्शन देखील भरले होते. या उत्सवातून कलाकारांना आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली, तर दर्शकांना कला, संस्कृती आणि मनोरंजनाचा आनंद घेण्याची संधी मिळाली.
विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिवल हा केवळ एक कला उत्सव न होता, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक एकतेचे प्रतीक होता. या उत्सवातून विविध धर्म, भाषा आणि संस्कृतींच्या लोकांनी एकत्र येऊन आपली सांस्कृतिक विरासत साजरी केली.
विहंग संस्कृती आर्ट्स फेस्टिवल २०२५ हा कला, संस्कृती आणि मनोरंजनाचा असा सण होता, जो लोकांच्या मनात कायमस्वरूपी उमटून राहील.