वाऱ्यासंगे येशील का रे ???
मृदगंधाच्या घेऊनी लाटा
इंद्रधनुच्या चिंब कमानी
लयकारीच्या रंगछटा !!!
धारेसंगे देशील का रे ???
मोतियांच्या पूरवाटा
अधरावरची कुंद निशाणी
नि झोंबणाऱ्या विरहकथा !!!
पाऱ्यासमवे जातोस का रे ???
खोडसाळुनी पर्ण बटा
वाट पाहती रिक्त मनाने
बांधावरल्या तहानवाटा !!!
बांधावरल्या तहानवाटा !!!
Well written Surabhi. 👍👏👏👏