आज मराठी सिनेमाचा अजातशत्रू म्हणून ओळखला जाणारा नाना पाटेकर आपला वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या खंबीर अभिनयाने आणि वास्तववादी भूमिकांनी त्यांनी मराठीसह हिंदी सिनेमात एक वेगळी छाप उमटवली आहे.
नाना पाटेकर: मराठी सिनेमाचा अजातशत्रू
नाना पाटेकर यांचा जन्म 1 जानेवारी 1951 रोजी, मुरुड जंजिरा इथे झाला, हे गाव मुंबई जवळ आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नानांच्या वडिलांना तमाशा बघायला खूप आवडायचं. त्यांचे वडील त्यांना बघायला सोबत न्यायचे, आणि तेव्हापासून त्यांना नाटक बघण्याची आवड निर्माण झाली. नंतर ते शाळेच्या नाटकामध्ये काम करू लागले, काही दिवसांपुर्वी आमिर खान सोबत, चर्चेत त्यांनी सर्वांना सांगितलं. आमिर खान यांनी पण त्यांची खूप स्तुती केली, त्यांच्या कठोर परिश्रमातून ही यशस्वी कारकीर्द घडवून काढली. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केल असून प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. आज नाना पाटेकर ७४ वर्षाचे झाले व बॉलीवूड मध्ये आजही ते कार्यरत आहे.
नाना पाटेकरांनी आज गाठला वय ७४, आजही ते फिट व स्ट्रॉन्ग आहे. त्यांची नवीन सिनेमा “अपनेही देते है अपनोको वनवास” सिनेमाघरात २० डिसेंबर पासून उपलब्ध आहे.
मध्यंतरी त्यांना अनिल कपूर यांनी विचारले कि तुम्ही कसेकाय डायलॉग डिलिव्हरी करता? तेव्हा त्यांनी सांगितलं व त्यांचे बरेच कलाकारांना सांगणं आहे कि स्क्रिप्ट वाचून-वाचून मनात एवढी आत्मसात करा कि ती झोपता, उठता, बसता तुम्हाला डायरेक्टरन जर विचारलं तर २० वर्षानं पण ते लक्षात राहिल पाहिजे. नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार पटकावले आहेत. राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यासारखे प्रतिष्ठित पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या अभिनयाचे कौतुक देशभरातच नव्हे तर परदेशातही केले जाते.
नाना पाटेकर हे केवळ अभिनेते म्हणूनच नाही तर दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांनी काही चित्रपट दिग्दर्शित आणि निर्मित केले आहेत. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची प्रेक्षकांनी उत्सुकतेने वाट पाहिली जाते. नाना पाटेकर यांच्या चित्रपटांमधील संवाद आजही प्रेक्षकांच्या ओठांवर असतात. त्यांच्या भूमिकांमधील वास्तववाद आणि खंबीरपणा हीच त्यांची ओळख आहे. त्यातला एक म्हणजे ‘एक मच्छर आदमीको हिजडा बाना देता है‘ असे बरेच त्यांचे डायलॉग लाखों चाहत्यांच्या ओठांवर येते. नाना पाटेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक खास गोष्ट म्हणजे त्यांची सामाजिक जागरूकता.