भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेशने आज शब्दशः इतिहास घडवला आहे.
अवघ्या अठराव्या वर्षी जागतिक बुद्धिबळ विजेता डिंग लिरेनला हरवून गुकेशने विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल डी गुकेश, त्याचे कुटुंबीय, आणि प्रशिक्षक यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
बुद्धिबळ हा केवळ एक खेळ नसून कला, विज्ञान आणि खेळाचा अनोखा संगम आहे.
या खेळाने भारतात आणि महाराष्ट्रात वृद्धिंगत व्हावे, तसेच जगज्जेत्यांची मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
गुकेशचा हा पराक्रम संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरला असून, बुद्धिबळाच्या क्षेत्रात भारताचा झेंडा अधिक उंचावला आहे.
या ऐतिहासिक यशाबद्दल तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा!
वाचल्याबद्दल धन्यवाद आणखी साप्ताहिक ला वाचा साईट ला व्हिसिट द्या.
Visit site