पुण्यातील साक्षात देवीची उपासना करणाऱ्या भक्तांसाठी तुळजापूर हे अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. पुण्याहून निघताना “काय रस्ता घ्यावा? किती वेळ लागेल? कोणत्या महिन्यात जायला हवं?” असे अनेक प्रश्न मनात येतात. चला, जाणून घेऊया संपूर्ण मार्गदर्शन.
पुणे ते तुळजापूरचा सर्वात सोपा मार्ग
पुणे ते तुळजापूर अंतर अंदाजे 293.5 किलोमीटर आहे, आणि NH 65 मार्गाने हे अंतर साधारणतः 5 तास 32 मिनिटांत पार करता येते. पुण्यातून NH 65 हा मार्ग घेतल्यास सोलापूर मार्गे सहज आणि सुरक्षितपणे तुळजापूर गाठता येते. तुम्ही बस, कार किंवा ट्रेन ने प्रवास करू शकता. जर तुम्हाला ट्रेन ने प्रवास करायचा असेल तर पुणे स्टेशनवरून तुम्हला सकाळी ट्रेन मिळेल जी तुम्हाला ४ तासाच्या आत सोलापूरला पोहचवते.
भवानी देवीचे दर्शन कधी घ्यावे?
तुळजाभवानीच्या दर्शनासाठी श्रावण महिना, नवरात्र आणि माघ महिन्यात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी असते. पण सर्वात योग्य वेळ म्हणजे ऑगस्ट ते नोव्हेंबर, कारण या काळात हवामान अनुकूल आणि गर्दी तुलनेत कमी असते.
महाप्रसाद मिळतो का?
तुळजापूरच्या मंदिरात महाप्रसादाची सुविधा नाही, मात्र मंदिर परिसरात विविध स्वादिष्ट शाकाहारी भोजन मिळते. स्थानिक खानावळींमध्ये चविष्ट महाराष्ट्रीयन पदार्थांचा आस्वाद घेता येतो.
सोलापूर पासून अंतर आणि बसेसची सुविधा
सोलापूर पासून तुळजापूरला पोहोचण्यासाठी साधारणतः १ तासाचा बस प्रवास लागतो (55 min (45.9 km) via NH 52). एमएसआरटीसी आणि खासगी बसेस भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. पुण्यात परत येण्यासाठीही नियमित बसेस असतात, त्यामुळे प्रवासाच्या सोयीसाठी कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.
महाराष्ट्रीय जनतेसाठी “मराठी टुडे” कसे उपयुक्त आहे?
“मराठी टुडे” हा महाराष्ट्रातील विविध ठिकाणांची माहिती, संस्कृती, तसेच प्रवास संबंधित अद्ययावत माहिती देणारा एक उपयुक्त स्रोत आहे. आपल्याला आपल्या राज्याशी संबंधित जीवनशैली व माहिती मिळवायची असल्यास हा एक उत्तम पर्याय आहे.