दान करा

चीन जहाजाने मुंबईत नौकेला दिलेली धडक: भरपाई वितरण

मुंबईतील अपघातात नुकसान झालेल्या मासेमारी नौकेस ₹18.55 लाख भरपाई; एलिफंटा केव्हस फेरी अपघातात दोन मृत्यू, 80 जणांची भारतीय तटरक्षक दलाने सुटका.
मुंबईतील अपघातात नुकसान झालेल्या मासेमारी नौकेस ₹18.55 लाख भरपाई
मुंबईतील अपघातात नुकसान झालेल्या मासेमारी नौकेस ₹18.55 लाख भरपाई

मुंबईतील अपघातात नुकसान झालेल्या मासेमारी नौकेस ₹18.55 लाख भरपाई

१७ जानेवारी, मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘तिसाई’ मासेमारी नौकेचे मालक हेमदीप टिपरी यांना ₹18.55 लाख नुकसान भरपाईचा धनादेश प्रदान करण्यात आला. ही भरपाई चीनच्या मालवाहतूक जहाजाने नौकेला धडक दिल्याने झालेल्या नुकसानीसाठी देण्यात आली आहे. या प्रकरणात चीनच्या कंपनीने नुकसान भरपाईला मान्यता दिली होती आणि ती आज वितरित करण्यात आली.

या कार्यक्रमाला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री नितेश राणे आणि मंत्रिमंडळातील अन्य सदस्य, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील एलिफंटा फेरी अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मुंबई, डिसेंबर १८, मुंबईत एका वेगवान स्पीडबोटने एलिफंटा केव्हसकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीला जोरदार धडक दिल्याचा व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला होता, गेटवे ऑफ इंडिया पासून 11 किमी अंतरावर असलेले एलिफंटा केव्हस हे हिंदू आणि बौद्ध वारसा जोपासणारे प्राचीन शिल्पकलेचे ठिकाण आहे.

या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 80 हून अधिक प्रवाशांना भारतीय तटरक्षक दलाने वेळीच वाचवले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, नीलकमल फेरीमध्ये 85 प्रवासी आणि चालक दलातील सदस्य प्रवास करत होते. ती दुपारी 3:15 वाजता मुंबईहून निघाली होती.

एलिफंटा फेरी अपघाताने प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. प्राचीन ठिकाणांना भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

समुद्रमार्गे प्रवास करताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे. एलिफंटा फेरी अपघात आणि तिसाई नौकेच्या नुकसानीसारख्या घटना टाळण्यासाठी अधिक कठोर सुरक्षा उपाय लागू होणे गरजेचे आहे. ‘तिसाई’ मासेमारी नौकेचे मालक हेमदीप यांना ₹18.55 लाख नुकसान भरपाई चा चेक देण्यात आला.