देहू तुकाराम महाराज मंदिर
पुणे जिल्ह्यातील इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले देहू गाव, संत तुकाराम महाराजांच्या भक्तिमय जीवनाची साक्ष देणारे पवित्र स्थळ आहे. संत तुकाराम महाराज, १७व्या शतकातील महान संत, यांचे जन्मस्थान म्हणून देहूची ओळख आहे. त्यांच्या अभंगांनी मराठी साहित्य आणि भक्तिसंप्रदायात महत्त्वपूर्ण स्थान मिळविले आहे.
देहू तुकाराम महाराज मंदिराचा इतिहास
संत तुकाराम महाराजांच्या भक्तांनी त्यांच्या स्मृतींना जपण्यासाठी देहू येथे मंदिराची स्थापना केली. या मंदिरात दररोज हजारो भक्त दर्शनासाठी येतात. मंदिराच्या वेळा सकाळी ५ ते रात्री १० पर्यंत आहेत, आणि महापूजा व आरती पहाटे ५ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता संपन्न होते.
गाथा मंदिर: भक्ती आणि संस्कृतीचे केंद्र
देहू येथील गाथा मंदिर हे संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेचे संरक्षण आणि प्रचार करण्यासाठी स्थापन करण्यात आले आहे. सुमारे ७ एकर ३० गुंठे क्षेत्रफळावर पसरलेल्या या मंदिरात ३५,००० चौरस फूटाचे भव्य तीन मजली अष्टकोनी रचना आहे. मध्य अष्टकोनात १२५ फूट उंचीचे शिखर असलेले मंदिर आहे, ज्यामध्ये तुकाराम महाराजांची पंचधातूंची भव्य मूर्ती प्रतिष्ठापित आहे. तुम्हाला त्यांनी लिहलेले ग्रंथाचे रूपांतर सांगेमरच्या दगडांच्या भिंतीवर कोरीव केलेले दिसणार. लाखो भक्तांना ते वाचायला प्रेरित करतात. त्यांनी लिहिलेली एक कविता ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वानचणारी‘ ही एक खूप सुंदर अशी कविता आहे ज्यात आपल मन आपल्याशी बोलू लागते व आपली आत्मा सुद्ध व स्क्रब करते. त्याचा अर्थ लेख मॅगझीन वर तुम्हाला वाचायला आवडेल.
पुणे: पूर्वेचे ऑक्सफर्ड ज्यात अफाट अमूल्य संस्कृती व शिक्षण आहे
पुणे शहराला ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाते, कारण येथे अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना झाली आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पुणे महत्त्वपूर्ण स्थान राखते. देहूला जायला तुम्हाला बस किंवा रिक्षाने सहजपणे जाऊ शकता. पुणे रेल्वे येथून तुम्हाला सतत ३० मिनिटामध्ये बस मिळू शकते तसेच जर तुम्हाला आळंदी पासून देहूला जायला बरेच बसेस मिळेल. तिथे जायला तुम्हाला एकूण दीड तास लागतील, २९.७ किलो मीटर आहे. जर तुम्हाला बस ने प्रवास करायचा असल्यास ४० रुपये भाडं लागतील.
मराठी टुडे: आपल्या सेवेत
मराठी टुडे आपल्या वाचकांना महाराष्ट्राच्या संस्कृती, जीवनशैली आणि माहितीशी संबंधित दैनिक अद्यतने प्रदान करते. आमच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जीवनशैलीविषयी माहिती मिळवू शकता.
देहू येथील तुकाराम महाराज मंदिर आणि गाथा मंदिर हे भक्ती, संस्कृती आणि इतिहासाचे प्रतीक आहेत. पुणे शहराची शैक्षणिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा यामुळे ते ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणून ओळखले जाते. मराठी टुडे आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे. आपण या सांस्कृतिक ठेव्याचे संरक्षण कसे करू शकतो?