किडनी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्याचे महत्त्वाचे कार्य करते. मात्र, चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि आहारातील अयोग्य सवयींमुळे किडनी खराब होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
शरीराकडून काही संकेत मिळतात, जे किडनीच्या समस्या दर्शवतात. किडनी खराब होण्याची वेळेत लक्षणे ओळखून योग्य उपचार करणे गरजेचे आहे.
किडनी खराब होण्याची 10 लक्षणे
- चेहऱ्यावर आणि पायांवर सूज: जर सकाळी उठल्यावर चेहरा किंवा पाय सुजलेले वाटत असतील तर ही किडनी खराब होण्याची प्राथमिक लक्षणे असू शकतात.
- मूत्राशयाच्या सवयींमध्ये बदल: जर वारंवार लघवीला जावे लागत असेल किंवा लघवी करताना जळजळ होत असेल तर ही चिन्हे किडनी इन्फेक्शनकडे निर्देश करतात.
- थकवा आणि कमजोरी: किडनी कार्यक्षमता कमी झाल्यास शरीरात विषारी घटक साचतात, त्यामुळे सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.
- पाठदुखी: किडनी स्टोन किंवा इन्फेक्शनमुळे कमरच्या खाली वेदना जाणवू शकते.
- त्वचेशी संबंधित समस्या: कोरडी त्वचा आणि सतत खाज सुटण्यामागे किडनीची समस्या असू शकते.
- उलटी आणि भूक मंदावणे: जेव्हा किडनी योग्यरित्या फिल्टरिंग करू शकत नाही, तेव्हा शरीरात टॉक्सिन्स साचतात आणि भूक मंदावते.
- श्वासाचा त्रास: रक्तात विषारी घटक वाढल्यास फुफ्फुसांवर परिणाम होतो, ज्यामुळे श्वासोच्छवासात अडचण येते.
- रक्तदाब वाढणे: किडनी खराब झाल्यास रक्तदाब नियंत्रित राहत नाही आणि सतत उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवतो.
- लघवीत फेन येणे: जर लघवीत जास्त फेस दिसत असेल तर किडनीमध्ये प्रोटीन लीक होत असल्याचे संकेत मिळतात.
- अर्धांगवायूची शक्यता: दीर्घकाळ किडनीच्या समस्या दुर्लक्षित ठेवल्यास हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका वाढतो.
घरगुती उपाय रामबाण
- पुरेशी पाणी प्या: दररोज 2-3 लिटर पाणी पिल्याने किडनीचे कार्य सुधारते.
- आहारात सुधारणा: मीठाचे प्रमाण कमी करा आणि ताज्या फळभाज्या आणि फळे खा.
- योग आणि व्यायाम: दररोज योगासन आणि व्यायाम केल्याने किडनी निरोगी राहते.
- औषधांचा मर्यादित वापर: जास्त औषधांचे सेवन टाळा, कारण यामुळे किडनीवर ताण येतो.
- हर्बल उपाय: गोखरू, पुनर्नवा सारख्या आयुर्वेदिक वनस्पतींनी किडनीला फायदा होतो.
किडनीच्या समस्यांची वेळीच दखल घेतली तर गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात. जर तुम्हाला वरील लक्षणांपैकी कोणतेही जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. निरोगी जीवनशैली आणि संतुलित आहाराने किडनीचे आरोग्य जपता येते.