सध्या बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलेलं वक्तव्य चर्चेत आलं. या वक्तव्यावर प्राजक्ता माळीने मुंबईत पत्रकार परिषद घेऊन कडाडून उत्तर दिलं. प्राजक्ताने सांगितलं की, राजकारणासाठी महिला कलाकारांच्या नावाचा गैरवापर करणं हे अतिशय लाजीरवाणं आहे.
प्राजक्ता माळीने या संदर्भात महिला आयोगात तक्रार दाखल केली असून, तिने सुरेश धस यांची जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेत तिने म्हटलं, “मी शांत होते, याचा अर्थ माझी मूकसंमती नव्हती. राजकीय स्वार्थासाठी कलाकारांना ओढणं थांबलं पाहिजे.”
‘फुलवंती’ या सुपरहिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारलेल्या प्राजक्ताला मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. गश्मीर महाजनीनेही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनदरम्यान चाहत्याने त्याला विचारलं, “प्राजक्ताच्या समर्थनार्थ तू काय बोलशील?” यावर गश्मीरने सांगितलं, “प्राजक्ता खंबीर, स्वतंत्र, आणि सशक्त स्त्री आहे. मी तिचा खूप आदर करतो.”
गश्मीरने ‘फुलवंती’ चित्रपटात शास्त्री बुवाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट प्राजक्ताने स्वतः निर्मित केला होता. प्राजक्ता माळीला सचिन गोस्वामी, सुशांत शेलार, विशाखा सुभेदार, कुशल बद्रिके, आणि पृथ्वीक प्रताप यांसारख्या अनेक कलाकारांनीही पाठिंबा दिला आहे.
प्राजक्ता म्हणाली, “सुरेश धस यांनी जी टिप्पणी केली, ती वैयक्तिक स्वार्थासाठी होती. एखाद्या फोटोच्या आधारे असे आरोप करणे चुकीचे आहे.” तिने आपले अनुभव सांगत म्हणाले की, “महिला कलाकारांना सतत अशा प्रकारच्या परिस्थितींना सामोरे जावे लागते.”
बीडमध्ये सुरु असलेल्या सरपंच हत्या प्रकरणाचा तपास अजूनही सुरु आहे. यादरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. प्राजक्ता माळीच्या पत्रकार परिषदेनंतर मनोरंजन विश्वात तिच्या बाजूने एकजूट दिसून येत आहे. ट्विटरवर #boycottprajakta नावाचा डंका, सगळे मराठी बांधव ट्विट करत संगतफिरले.