दान करा

राज ठाकरे यांची डोळेउघड ट्विटर पोस्ट: वाचा २०२५ चे महत्वाचे मुद्दे

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांसाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे. बदलांची दिशा काय? वाचा सविस्तर.

नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह राज ठाकरेंनी तुम्हाला सांगितले कि गेल्या २५ वर्षांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून सर्वांनी अनेक चढ-उतार पाहिले आहेत. हा काळ पूर्ण बदलांनी व्यापलेला असूनही काही समस्या आजही कायम आहेत ज्यासाठी त्यांना झटायचे आहे.

महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसाची असुरक्षितता असे त्यांनी सांगितले. त्यांना अजूनही बेरोजगारीचे संकट डोळ्यासमोर दिसत आहे. त्याचबरोबर महागाईमुळे होरपळणारे जीवन यांसारख्या मुद्द्यांनी आपण सर्वांनी जागरूक राहायला पाहिजेत.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांसाठी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे. बदलांची दिशा काय? वाचा सविस्तर.
राज ठाकरे नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर भाष्य केले आहे.

त्यांनी व त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच लोकांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण केला. मात्र सगळं वाया जातांनी दिसतं. ते म्हणतात कि मतदानाच्या वेळेस सगळे विसरून जातात. ह्या खंतावणाऱ्या सत्यासोबत आपण सर्व जगत आहो. तरीही, आपण या गोष्टी मागे ठेवून नव्या उमेदीने कामाला सुरुवात केली पाहिजे. विधानसभेच्या निकालांनंतर राज ठाकरेंनी काही काळ राजकीय भाषणे टाळली, पण आता विचारमंथनाच्या टप्प्यानंतर लवकरच सविस्तर बोलण्याचा मानस आहे.

राज ठाकरे यांची ट्विटर पोस्ट आपल्यांना जागवून करून जाते, वाचा त्यांची पोस्ट

माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, सर्व प्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! कालगणनेत या वर्षाला एक महत्व आहे , कारण या शतकातील, पाव शतक संपायला आलं. माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रांत इतके प्रचंड बदल झालेत की २५ वर्षांपूर्वीच आयुष्य हे वेगळं युग वाटावं. या २५ वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली, तो स्थिरावला, पक्षाने अनेक चढउतार पाहिले. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं. या २५ वर्षांत जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात, मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे, तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं. तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणे पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यान नोकरीच्या संधी मिळणं. बेरोजगाराला जात नसते, पण त्याला ती जात जाणवून देऊन, जातीजातीत भांडणं लावणं. शेतकऱ्यापासून ते सर्वच कष्टकऱ्यांच आयुष्य महागाईने होरपळून निघणं. आणि या आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणे, पण नेमकं मतदानाच्या वेळेस पक्षाचा विसर पडणे. पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी विधानसभेचे निकाल लागल्यानंतर मी काही सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालो, पण मुद्दाम राजकीय भाष्य टाळलं. नक्की काय घडलं यावर माझं मंथन सुरु आहे आणि लवकरच मी या सगळ्यावर सविस्तर बोलेन. पण महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे की जे घडलं ते विसरून जा. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढे काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरु झाली, आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील. मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं. त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत. राज्यातले दोन समाज जे दोन्ही मराठी भाषिक, पण त्यांच्यात संघर्ष पेटला आहे. आणि महागाईने लोकं होरपळली आहेत. असं असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातील खंत आता बाजूला ठेवली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे. मी मागे म्हणलं तसं मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन, ते आपण करत आहोतच. पण राज्यात महिलांच्यावर जे अत्याचार होत आहेत, त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरु करा. महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा. आणि तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमाना चांगलं फोडून काढा. महागाईने होरपळलेल्याना दिलासा द्यायला हवा, यासाठी साठेबाजी होत नाहीये ना, हे पाहून त्याची सूचना संबंधित खात्याना करा आणि त्याच्या जोडीला शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील दुवा बनण्याचा प्रयत्न करा. थोडक्यात आपल्या शाखा, कार्यालयं पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा. आणि हो, हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाही आहोत ना हे पहा. लवकरच मी सविस्तर बोलेन, त्यात अधिक व्यापक दिशा तुम्हाला देईनच. तोपर्यंत नवीन वर्षासाठी आणि पुन्हा नव्याने कामाला सुरुवात करण्यासाठी शुभेच्छा !

राज ठाकरे ।

असे म्हणत त्यांनी नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र सैनिकांना नव्या ऊर्जेने कामाला लागण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांच्या या संदेशात महाराष्ट्र सैनिकांसाठी विचार करण्यासारखे मुद्दे आहेत. पक्षाची दिशा बदलांसह ठरवताना राज ठाकरे यांचा हा मार्गदर्शक संदेश प्रेरणादायी ठरेल.