दान करा

24

मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: पुणे पुस्तक महोत्सव वाचन संस्कृतीला चालना देणारा उपक्रम

पुणे पुस्तक महोत्सव 2024: सांस्कृतिक राजधानी पुण्यात वाचन संस्कृतीला चालना देणारा कार्यक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महोत्सवाला पाठिंबा.

मराठी टुडे टीम
Initially published on:
पुणे पुस्तक महोत्सव 2024: सांस्कृतिक राजधानी पुण्यात वाचन संस्कृतीला चालना देणारा कार्यक्रम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महोत्सवाला पाठिंबा.
पुणे हि सांस्कृतिक राजधानी आहे. | Photo credit: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस twitter

पुणे: मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, “पुणे ही सांस्कृतिक राजधानी असून वाचन संस्कृतीला चालना देणाऱ्या ‘पुणे पुस्तक महोत्सव’ सारख्या कार्यक्रमांचे आयोजन महत्त्वाचे आहे. मागील वर्षी या कार्यक्रमाला मी हजेरी लावली होती आणि पुणेकरांनी दिलेला प्रचंड प्रतिसाद खरोखरच थक्क करणारा होता. यंदाही निमंत्रण मिळाल्यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित राहून मी आनंदी आहे.”

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1867927028105888076

पुणे हि सांस्कृतिक राजधानी आहे

फडणवीस पुढे म्हणाले, “सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात अशा कार्यक्रमांमुळे वाचन संस्कृतीला बळकटी मिळते. हा उपक्रम पुणेकरांमध्ये ज्ञानाचा विस्तार घडवण्याचे साधन ठरेल.”

पुणे पुस्तक महोत्सव हे पुस्तकप्रेमींसाठी एक अनोखे व्यासपीठ आहे. लेखक, प्रकाशक, आणि वाचक यांच्यात संवाद घडवून आणणारा हा महोत्सव पुण्याच्या सांस्कृतिक वारशाला एक नवीन उंची देतो. यावेळीही पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा महोत्सव यशस्वी करावा, असे आवाहन मा. मुख्यमंत्री यांनी केले.

पुणेCultural Events PunePune Book FestivalReading Cultureदेवेंद्र फडणवीसपुणे कार्यक्रमपुणे पुस्तक महोत्सवपुस्तकप्रेमीमहाराष्ट्रवाचन संस्कृतीसांस्कृतिक राजधानी
मराठी टुडे टीम
भारतातील बातम्या, मनोरंजन आणि बरेच काही शोधा! मराठी टुडे हा तुमचा दैनंदिन डोस ज्याची देशभरात चर्चा आहे.

Leave a Comment