दान करा

24

पॅन कार्ड माहिती: प्रत्येक भारतीयासाठी गरजेचे ओळखपत्र

पॅन कार्ड म्हणजे काय? पॅन कार्डचे महत्त्व, बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे, 10 अंकी नंबरचा अर्थ, वाचा सविस्तर मराठीत.

मराठी टुडे टीम
Initially published on:

मित्रानो, तुम्हाला कधी ना कधी पॅन कार्डची गरज पडली असेल. आजच्या लेखामध्ये आपण पॅन कार्ड म्हणजे काय, त्याचे महत्त्व, कसे तयार करावे, त्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि त्याचा वापर याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.

पॅन कार्ड माहिती, लागणारी कागदपत्रे व ऑनलाईन कसे अर्ज करावे, जाणूनघ्या सविस्तर माहिती

हे एक सर्वात महत्वाचं कागतपत्र आहे. जर तुम्ही पदवीधर आले आणि नोकरीच्या तालाश्मध्ये असेल तर समोर अर्थाला येण्याअगोदर तुम्ही लवकरच पॅनकार्ड तयार करण्यासाठी अर्ज करा. अर्ज कसा करायचा व त्याला लागणारे सर्व कागदपत्रे खालीलप्रमाणे तुमच्याजवळ तयारकरून ठेवा. चला मग जानुनघ्या तुम्हाला काय व कोणते पत्रे पाहिजेत.

पॅन कार्ड म्हणजे काय?

पॅन कार्डचे पूर्ण नाव Permanent Account Number आहे. हे एक अद्वितीय ओळखपत्र असून, 10-अंकी अल्फान्युमेरिक क्रमांकाच्या स्वरूपात असते. पॅन कार्ड मुख्यतः आयकर विभागाच्या अंतर्गत तयार केले जाते आणि सर्व महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांसाठी अनिवार्य आहे.

पॅन कार्डचा उपयोग:

  1. ओळखपत्र: पॅन कार्डवरील फोटो, नाव, आणि सही ओळखपत्र म्हणून वापरता येते.
  2. कर भरणा: पॅन कार्डशिवाय जास्त कर भरावा लागू शकतो.
  3. बँकेसाठी गरज: बँकेत खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे.
  4. मालमत्ता व्यवहार: प्रॉपर्टी खरेदी-विक्रीसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.
  5. NRI साठी सुविधा: परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही पॅन कार्डच्या मदतीने भारतात व्यवसाय किंवा मालमत्ता व्यवहार करता येतात.

पॅन कार्डवरील 10-अंकी क्रमांकाचा अर्थ

पॅन कार्डवरील 10 अंकी अल्फान्युमेरिक क्रमांक विशिष्ट माहिती साठवतो.

  • पहिली तीन अक्षरे: सामान्य वर्णमाला क्रमाने असतात.
  • चौथे अक्षर: पॅन कार्डधारकाची स्थिती दर्शवते (P – व्यक्ती, C – कंपनी, इत्यादी).
  • पाचवे अक्षर: व्यक्तीच्या आडनावाचे पहिले अक्षर किंवा संस्थेच्या नावाचे पहिले अक्षर असते.
  • शेवटचा अंक: विशिष्ट सूत्रानुसार काढलेला असतो.

पॅन कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:

  1. फोटो: दोन पासपोर्ट आकाराचे फोटो.
  2. जन्मतारीख पुरावा: जन्म प्रमाणपत्र, मॅट्रिक प्रमाणपत्र, पासपोर्ट.
  3. ओळखपत्र: आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, पेन्शन कार्ड.
  4. पत्ता पुरावा: विजेचे बील, टेलिफोन बील, ड्रायव्हिंग लायसन्स.

टीप: सर्व कागदपत्रे A4 साइज मध्ये स्वतःची सही (Self Attested) असणे गरजेचे आहे.

पॅन कार्ड ऑनलाईन डाउनलोड कसे बनवावे?

पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही आयकर विभागाच्या incometaxindia.gov.in किंवा tin-nsdl.com या संकेतस्थळावर अर्ज करू शकता. अर्ज करताना 107 रुपयांचे शुल्क लागते. तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगच्या मदतीने पेमेंट करू शकता. तसेच १५ दिवसात पुन्हा इथे येऊन डाउनलोड करा.

पॅन कार्ड बनवण्याचा वेळ

पॅन कार्ड बनवल्यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळतो. या क्रमांकाद्वारे तुम्ही पॅन कार्डचा स्टेटस जाणून घेऊ शकता. पॅन कार्ड साधारणतः 15-20 दिवसांत तुम्हाला मिळते.

प्यानकार्डच भविष्यातील महत्त्व खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण आपले शिक्षण पूर्ण करतो व एखादा नवीन जॉब बघायला मार्केट मध्ये जातो तेव्हा तुमचा बँकेत पगार येण्यापूर्वी किंवा बँकेचे खाते सुरु करण्यासाठी लागण्याच्या कागदपत्रांमधलं हे एक सर्वात महत्वाचा कार्ड आहे.

भारत सरकार लवकरच पॅन कार्डला आधार कार्डप्रमाणे अनिवार्य करणार आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर आजच तयार करून घ्या. पॅन कार्ड हे केवळ ओळखपत्र नसून आर्थिक व्यवहारांमध्ये आवश्यक असलेली महत्वाची कागदपत्र आहे. जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल, तर लगेच अर्ज करा आणि तुमचे आर्थिक व्यवहार सुलभ करा. लेख आवडल्यास तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा!

आर्थिकIncome TaxPan Card MarathiPan Card Online ApplyPan Card Usesओळखपत्रपॅन कार्डपॅन कार्ड कसे बनवावेपॅन कार्ड माहिती
मराठी टुडे टीम
भारतातील बातम्या, मनोरंजन आणि बरेच काही शोधा! मराठी टुडे हा तुमचा दैनंदिन डोस ज्याची देशभरात चर्चा आहे.

Leave a Comment